पीएम श्री अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण जिल्हास्तरीय प्रशिक्षण
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम २१ नुसार प्रत्येक प्राथमिक शाळेत एक शाळा व्यव्यस्थापन समिती असेल असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रत्येक शाळेत 12 ते 16 सदस्य असलेली शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये 50% महिला सदस्यांचा सहभाग घेण्यात आला. २५% अन्य प्रतिनिधी घेण्यात आले. विध्यार्थ्यांचाही सहभाग घेण्यात आला. शाळेचा विकास आराखडा तयार करणे ,विध्यार्थी उपस्थिती ,स्वच्छता ,शिक्षणाची गुणवत्ता ,निधीचा वापर इत्यादी मुख्य कामात या समितीने मोलाची भूमिका बजावली.
देशातील विद्यमान सरकारी शाळांना आदर्श शाळा बनवणे या साठी 7 सप्टेंबर 2022 प्रधानमंत्री यांनी पीएम श्री शाळांची सुरुवात केली. या शाळा इतर शाळांना आदर्श म्हणजेच मॉडेल ठराव्यात आणि आधुनिक सरकारी शाळेत विध्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण कौशल्याधिष्ठित आणि भाविष्याभिमुक शिक्षण मिळावे हा त्यामागचा उद्धेश.
पीएम श्री योजनेअंतर्गत सध्या जवळपास 12079 शाळा आहेत.14500 प्लस शाळांचे लक्ष आहे. कोणताही सामाजिक उपक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा आहे .राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) नुसार शिक्षण देणे विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळेतील पायाभूत सुविधा आणि पर्यावरण पूरक वातावरण निर्मितीसाठी शाळा व्यावस्थापन समितीला अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे त्यासाठी पीएम श्री शाळा शालेय व्यवस्थापन समिती सक्षमीकरण जिल्हास्तरीय दोन दिवसाचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथे दिनांक 12 व 13 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आले. या साठी जिल्ह्यातील 35 पीएम श्री शाळेतील प्रत्येकी एक या प्रमाणे 35 प्रशिक्षणार्थी उपस्थित राहून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले.
सदर प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड येथे प्राचार्य डॉ निळेकर सर तसेच ज्येष्ठ अधिव्याख्यात्या डॉ.औंधकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.श्री प्रकाश शिरसे सर यांच्या कुशल नेतृत्वात व सुलभक श्री केंद्रे सर ,ढाकणे सर यांच्या साथीने पार पाडण्यात आले.सदरील प्रशिक्षणात पहिल्या दिवशी शाळा व्यव्यस्थापन समिती : रचना कर्तव्य व जबाबदाऱ्या ,गुणवत्तापूर्ण शिक्षण व शाळा व्यवस्थापन समिती , निपुण भारत अभियान: पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान ,बालकांचे हक्क व शाळा व्यवस्थापन समिती ,शालेय आपत्ती व्यवस्थापन व शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका ,शालेय आर्थिक व्यवस्थापन या मुद्यावर चर्चा केली. प्रत्येक घटकाचे महत्व विश्लेषण, चर्चा, प्रश्नोत्तरे, विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी शाळा विकास आराखडा ,माझ्या शाळेचे सामाजिक सामजिक अंकेक्षण, विविध परिशिष्टे ,यशोगाथा सर्वात शेवटी संदर्भ सूची ची माहिती घेतली .सदरील प्रशिक्षणात श्री कांबळे सर मुख्याध्यापक कन्या हायस्कूल मुखेड यांनी पीएम श्री अंतर्गत आलेला निधी कुठे आणि कसा वापरावा याविषयी मार्गदर्शन केले .पेठवडज येथील मुख्याद्यापकानी शाळेत सर्वांनी स्वत:ची क्षमता ओळखून झपाटून कामाला कसे लागावे यासठी प्रेरना दिली .
प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी सुरुची व स्वादिष्ठ भोजन व दोन वेळच्या चहाची व्यवस्था केली होती.प्रशिक्षणासाठी वही व पेन असे साहित्य देण्यात आले होते. निच्छितच सदरील प्रशिक्षणाचा वापर शाळेत गेल्यावर शाळेतील सहकारी व शाळा व्यवस्थापन समिती तील सदस्य यांचा वापर शाळा विकासात सकारात्मकतेने कसा वाढेल यात शंकाच नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा