https://1drv.ms/w/c/8cf1e0a552d7ebdc/EU8P1obxBB9NmR3vqr_zWFsBBYZc7whrGXULUMQXoUNOjA?e=LyJzsK
कार्यक्षमता प्रतवारी दर्शक
सध्याच्या काळात व्यक्ती प्रत्येक वस्तूची निवड त्या वस्तूचा दर्जा गुणवत्ता पाहूनच करत आहे. मग ती बाजारातील कोणती वस्तू असो किंवा सेवा असो प्रत्येक व्यक्ती आपल्याला चांगली वस्तु मिळाली पाहिजे किंवा चांगली सेवा मिळाली पाहिजे यांकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. व्यक्ती आजारी पडला तर चांगल्या डॉक्टर कडे जातो. आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी धडपडत असतो. सर्व सोयी सुविधा युक्त घर असावे असे त्याला वाटते. घरी उत्तम दर्जाचे धान्य खरेदी करतो. बाहेर असेल तर चांगल्या दर्जाच्या हॉटेल मधे जेवणासाठी जातो. प्रत्येक ठिकाणी गुणवत्ता स्वच्छता, सुरक्षितता या गोष्टीला प्राधान्य देतो
शासन सुद्धा या गोष्टीचा विचार करत असते आणि आपल्या प्रत्येक विभागातील प्रत्येक कार्यालय दर्जेदार कसे राहील लोकांना गुणवत्तापूर्ण सेवा कशी देता येईल. यासाठी प्रयत्न करते. त्यामध्ये जर आपण शिक्षण विभागाचा विचार केला तर शाळा हा घटक प्रमुखांनी विचारात घेऊन तो कसा दर्जेदार राहील यासाठी शासन वेगवेगळे मूल्यांकन कार्यक्रम आखत असते. शाळा सिद्धी,SQAAF शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, शासनाच्या विविध समित्या येऊन शाळा तपासून त्याचा दर्जा निश्चित करतात.
याच धर्तीवर 2018 19 पासून भारत सरकार तर्फे राज्यांचा शैक्षणिक दर्जा व निर्देशांक निश्चित केला जातो त्यासाठी खालील गोष्टीचा विचार केला जातो.
1. UDISE plus
2. NAS National achievement survey
3. समग्र शिक्षा योजना आराखड्यातील माहिती
4. सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आराखड्यातील माहिती
5. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील माहिती
6. प्रबंध/शगुन पोर्टल वरील माहिती
PGI कशासाठी
1. शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे
2. शाळांच्या दर्जाचे मूल्यमापन करणे
3. आवश्यक सुधारण्यासाठी निधी उपलब्धतेसाठी कार्यवाही करणे
4. याच्या साह्याने राज्यातील व्यवस्थात्मक व शैक्षणिक संपादक बाबी उंचावणे
PGI मूल्यांकनासाठी घटक शाळा नसून जिल्हा विचारात घेतला जातो. म्हणजे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत किती प्रमाणात सुविधा आहेत या सर्वांचा विचार करून जिल्ह्याचा ग्रेड ठरविला जातो आणि अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्याचा ग्रेड विचारात घेऊन राज्याचा ग्रेड निश्चित केला जातो.
PGI मध्ये एकूण सहा क्षेत्र आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये काही उपक्षेत्र आणि त्या उपक्षेत्रामध्ये 83 दर्शक आहेत. या 83 दर्शकांना 600 गुण दिले आहेत. विशेष म्हणजे आपण यु-डायस प्लस मध्ये जी माहिती भरली आहे त्यावरूनच ही सर्व माहिती घेतली जात आहे. आपण आता त्यांची थोडक्यात माहिती पाहूया.
क्षेत्र 1. निष्पत्ती 290 गुण
. अ.) अध्ययन निष्पत्ती - यामध्ये इयत्ता तिसरी इयत्ता पाचवी इयत्ता आठवी आणि इयत्ता दहावी या इयत्तेतील भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयातील मुलांच्या न्यास (NAS) परीक्षेतील प्रवीणतेवर आधारित 180 गुण देण्यात आले आहे. म्हणजेच त्या त्या इयत्तेतील किती टक्के विद्यार्थी त्या इयत्तेच्या अधिनिष्पत्ती मधे पात्र आहेत. हे या मधे पाहिले जाते यामध्ये खालील प्रमाणे दर्शक निश्चित केलेले आहेत.
- शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरीतील भाषा विषयात इयत्तनिहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 20
- शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता तिसरीतील गणित विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 20
- शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता पाचवीतील भाषा विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 20
- शासकीय आणि अनुदानित शाळा मधील इयत्ता पाचवीतील गणित विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 20
- शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता आठवीतील मराठी विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 15
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता आठवीतील गणित विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 15
शासकीय आणि अनुदानित शाळा मधील इयत्ता आठवीतील विज्ञान विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 15
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता आठवीतील सामाजिक शास्त्र विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 15
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता दहावीतील भाषा विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 10
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता दहावीतील गणित विषयात इयत्ता निहाय अध्ये निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 10
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता दहावीतील विज्ञान विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 10
शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये इयत्ता दहावीतील सामाजिक शास्त्र विषयात इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 10
ब.) प्रवेश परिणाम – यामध्ये 70 गुण देण्यात आलेले असून त्यामध्ये खालील दर्शकांचा समावेश आहे.
इयत्ता पहिली मध्ये प्रवेशित मुलांपैकी किमान एक वर्ष पूर्व प्राथमिक शिक्षण घेतलेल्या मुलांची टक्केवारी गुण 20
शाळा बाह्य मुलांची टक्केवारी गुण 10
संक्रमण दर: प्राथमिक ते उच्च प्राथमिक गुण 5
उच्च प्राथमिक ते माध्यमिक गुण 5
धारण दर प्राथमिक स्तरापर्यंत धारण दर गुण 10
माध्यमिक स्तरापर्यंत मुलांचा धारण दर गुण 10
माध्यमिक स्तरापर्यंत मुलींचा धरण दर गुण 10
असे एकूण 70 गुण प्रवेश परिणाम या उपक्षेत्राला दिले आहेत
क.शिक्षक उपलब्धता आणि व्यवसायिक विकास परिणाम- या उपक्षेत्रासाठी 40 गुण दिलेले असून त्यामध्ये खालील दर्शकांचा समावेश आहे
- निवडणूक आणि जनगणना या कामाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाजाची जबाबदारी सोपवलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांची टक्केवारी गुण 5
- विषय ज्ञान, अध्ययन निष्पत्ती, ICT कौशल्य, CWSN संवाद यामध्ये प्रशिक्षण मिळालेले जिल्ह्यातील शिक्षकांची टक्केवारी गुण 5
- RTE निदेशित विद्यार्थी शिक्षक यांचे गुणोत्तर पालन करणाऱ्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची टक्केवारी गुण 10
RTE निर्देशित विद्यार्थी शिक्षक यांचे गुणोत्तर पालन करणाऱ्या जिल्ह्यातील उच्च प्राथमिक शाळेची टक्केवारी गुण 10
शैक्षणिक मार्गदर्शनासाठी शेअर्सकडून दरमहा किमान दोन भेटी मिळाली अशी जिल्ह्यातील शाळांची टक्केवारी गुण 10
क्षेत्र .2 वर्ग आंतरक्रिया यासाठी 90 गुण ठेवण्यात आले आहेत
अ. अध्यापनाचे व्यवस्थापन या उपपरासाठी 60 गुण ठेवण्यात आले असून याची निदेशक खालील प्रमाणे
बाल वाटिका पूर्व प्राथमिक शिक्षण असलेल्या प्राथमिक शाळांची टक्केवारी गुण 10
शाळा सक्रियपणे शैक्षणिक समृद्धी उपक्रम राबवत तात जसे की प्रकल्प गटकार्य पोर्टफोलिओ वर्चुअल वर्ग सादरीकरण प्रश्नमंजुषा वादविवाद सर्जन लेखन गुण 5
शाळेमध्ये सतत आणि व्यापक मूल्यांकन सीसीईCCE लागू केलेल्या शाळांची टक्केवारी गुण 10
सर्व वर्गामध्ये शिक्षण परिणाम आधारित मूल्यांकन तक्ता तयार केलेल्या शाळांची टक्केवारी गुण 10
प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर राज्य केंद्रशासित प्रदेशाच्या अधिकृत भाषेत शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गुण 5
वर्ग व्यवहारांमध्ये श्रेणीबद्ध पूरक साहित्य वापरणाऱ्या शाळांची टक्केवारी गुण 5
प्रत्येक येथे साठी टी एल एम उपलब्ध असलेल्या शाळांची टक्केवारी गुण 5
समग्र अहवाल कार्ड प्रदान करणाऱ्या अनुदानित प्रशासकीय शाळांची टक्केवारी गुण 10
ब) अध्ययन समृद्धी उपक्रम - या उपक्षेत्रास 30 गुण देण्यात आलेले असून त्यासाठी खालील राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये किती टक्के विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावर आधारित निर्देशांक असं त्याप्रमाणे गुण देण्यात आले आहेत
*स्वच्छ भारत आणि जनसुरक्षा *
मुलांचे शौचालय गुण 2
मुलींचे शौचालय गुण 2
CWSN विद्यार्थ्यांसाठी शौचालय गुण 2
स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी सुविधा गुण 2
हात धुण्यासाठी विशिष्ट क्षेत्र गुण 2
शाळेत पावसाचे पाणी साठवण्याची रचना रेन वॉटर हार्वेस्टिंग गुण 2
*फिट इंडिया मोहीम सहभाग*
खेळाचे मैदान गुण 4
क्रीडा उपकरणे गुण 4
फिट इंडिया स्कूल म्हणून प्रमाणित गुण 4
*एक भारत श्रेष्ठ भारत*
शालेय स्तरावर नोंदणी करत उपक्रमापैकी किमान एक उपक्रम आयोजित केला आहे गुण 2
*समग्र शिक्षा अभियान*
समग्र शिक्षा मार्गदर्शक तत्त्वावर शाळा विकास आणि व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे गुण 4
क्षेत्र 3 पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क यासाठी 51 गुण ठेवण्यात आलेले असून खालील प्रमाणे निर्देशक आहेत
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेत मिळणे गुण 10
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून एका महिन्याच्या आत सर्व विद्यार्थ्यांना (प्राथमिक) गणवेश मिळणे गुण 5
मदत आणि उपकरणे मिळालेल्या पात्र शाळा CWSN गुण 5
विशेष प्रोत्साहन ( शिष्यवृत्ती ) उच्च प्राथमिक माध्यमिक शाळेतील मुलींची टक्केवारी गुण 5
ग्रंथालय वाचन कोपरा शाळेत असेल तर गुण 4
रेलिंग सह शाळेत रॅम्प असेल तर गुण 4
शाळेमध्ये एकात्मिक विज्ञान प्रयोगशाळा असेल तर गुण 4
Pm पोषण साठी शाळेमध्ये परसबाग असेल तर गुण 4
अनुदानित शाळांनी वापरलेल्या निधीवर खालील प्रमाणे
ग्रंथालयातील पुस्तके गुण 4
क्रीडा उपकरणे गुण 2
संयुक्त शालेय अनुदान अंतर्गत उपक्रम गुण 2
इको क्लब आणि युथ क्लब असेल तर गुण 2
अशाप्रकारे क्षेत्र तीन साठी 51 गुणांचा समावेश असलेले वरील निर्देशक आहेत
क्षेत्र 4. शालेय सुरक्षा आणि बाल संरक्षण या क्षेत्रासाठी 35 गुण असून खालील प्रमाणे निर्देशक दिलेले आहेत
प्रथम श्रेणीचे समुपदेशक म्हणून किती टक्के शाळांनी कोणत्याही एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे गुण 5
ज्या शाळांमध्ये सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले आहे त्यांची टक्केवारी स्ट्रक्चरल अंड नोन स्ट्रक्चरल ऑडिट गुण 5
ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक नियमित शालेय सुरक्षा आणि आपत्ती तयारी प्रशिक्षण घेतली त्या शाळेची टक्केवारी गुण 5
किती टक्के शाळा विद्यार्थ्यांच्या वार्षिक आरोग्य नोंदी ठेवतात गुण 5
उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक येथे मधील स्वसंरक्षण प्रशिक्षण घेतलेल्या मुलींची टक्केवारी गुण 5
आपत्ती व्यवस्थापन योजना एसडीएमपी विकसित केलेल्या शाळांची टक्केवारी गुण 5
राज्यशाळा मानक प्राधिकरण SSSA कडून स्व प्रमाणपत्र प्राप्त केलेले शाळांची टक्केवारी गुण 5
क्षेत्र 5 डिजिटल शिक्षण 21 व्या शतकात जगत असताना विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देणे महत्त्वाचे आहे त्यामुळे या नवीन क्षेत्राचा समावेश केलेला आहे त्याला एकूण 50 गुण आहेत. व या क्षेत्राची खालील प्रमाणे निर्देशकी आहेत.
शैक्षणिक उद्देशाने इंटरनेट सुविधा असलेल्या शाळांची टक्केवारी गुण 10
शैक्षणिक उद्देशाने संगणक लॅपटॉप वापरणाऱ्या शाळांची टक्केवारी गुण 10
संगणक सहाय्यक अध्यापन सुविधा असणाऱ्या शाळांची अर्थात स्मार्टवर्ग खोल्या असणाऱ्या शाळांची टक्केवारी गुण 10
विद्यार्थी संगणक गुणोत्तर गुण 10
संगणक वापरण्याचे आणि संगणकाद्वारे अध्यापनाचे प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांची टक्केवारी गुण 10
क्षेत्र 6 प्रशासन प्रक्रिया या क्षेत्रासाठी एकूण 84 गुण देण्यात आलेले असून त्यासाठी खालील प्रमाणे निर्देशके आहेत
मागील आर्थिक वर्षात समग्र शिक्षा निधी अंतर्गत वापरलेल्या अनुदानाची टक्केवारी गुण 10
हार्दिक सह्या मिळालेल्या शाळांची टक्केवारी एनजीओ सार्वजनिक उपक्रम गुण 4
शिक्षकांच्या उपस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी डिजिटल उपस्थिती प्रणाली असलेल्या शाळांची टक्केवारी गुण 15
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची निरीक्षण करण्यासाठी डिजिटल उपस्थिती प्रणाली असलेल्या शाळांची टक्केवारी गुण 15
विद्यार्थ्यांची सरासरी वार्षिक उपस्थिती (विद्यार्थी एकूण उपस्थिती/एकूण अध्यापन दिवस × एकूण शाळेतील विद्यार्थी) गुण 10
RTE नुसार प्राथमिक स्तरावरील मुख्याध्यापक शिक्षक मानकांचे पालन करणाऱ्या शाळांची टक्केवारी गुण 15
RTE नुसार उच्च प्राथमिक स्तरावरील मुख्याध्यापक शिक्षकांच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या शाळांची टक्केवारी गुण 15
अशाप्रकारे 83 दर्शकांसाठी 600 गुण देण्यात आलेले आहेत.
परंतु आपणाला हजार गुणांमध्ये त्याचे परावर्तन करायचे आहे त्यासाठी मिळालेल्या गुणांना 600 ने भागणे व आलेल्या उत्तराला 1000 ने गुणणे असे केल्यावर आपणास एक हजार पैकी गुण मिळतील. आपणाला आकांक्षी 3 जो दहावा ग्रेड आहे त्यामध्ये यायचे असेल तर 600 पैकी किमान 250 गुण तरी घ्यावीच लागतील. आपले उद्दिष्टे तर ग्रेड 1 मध्येच यायचे असेल पण यासाठी आपणाला भरपूर मेहनत करावी लागेल. आपणाला न्यास परीक्षेवर जास्त भर द्यावा लागेल UDISE प्लस भरताना काळजीपूर्वक भरावा लागेल शाळांना भौतिक सुविधा मिळवून देण्यावर भर द्यावा लागेल शासनाच्या विविध कार्यक्रमात सहभाग घ्यावा लागेल विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळवून द्याव्या लागतील त्याची सुरक्षितता जपावी लागेल स्वतःला नेहमी अपडेट ठेवावे लागेल त्यासाठी ट्रेनिंग घ्याव्या लागतील. अध्यापनात डिजिटल साधनाचा वापर करावा लागेल हे सर्व केल्यास निश्चितच आपल्या जिल्ह्याचा PGI निर्देशांक उंचावेल.
धन्यवाद…..
शब्दांकन
जळबा उमाजी सरोदे (विषय शिक्षक भाषा )
पी एम श्री जि प कें प्रा शा सरसम बु ता. हिमायतनगर जिल्हा नांदेड
Mob.9673929404./8788507508