मंगळवार, २९ जुलै, २०२५

तंबाखूमुक्त शाळा


 आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP)

यांच्या पुढाकारातून संपूर्ण भारतात तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रम राबवला जात आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र

यांनी सलाम मुंबई फाउंडेशनला अधिकृत परवानगी दिली आहे

शाळांमध्ये तंबाखूविरोधी कृतीसाठी सहकार्य व मार्गदर्शन देण्याकरिता

उद्दिष्ट : 

🔸 मुलांना तंबाखूच्या विळख्यातून दूर ठेवणे

🔸 शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध

🔸 आरोग्यदायी आणि सुरक्षित शिक्षणाचे वातावरण तयार करणे


❦ आपली भूमिका महत्त्वाची ❦

➤ शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक म्हणून

तुमच्याच नेतृत्वातून शाळा होणार तंबाखूमुक्त!

➤ तुमच्या कृतीतून मुलं शिकतात – आणि समाज बदलतो.

प्रेरणादायी मंत्र ❦

"आपण सुरुवात केली, तर एक शाळा बदलू शकते –

एक शाळा बदलली, तर एक पिढी वाचू शकते!"

आपली शाळा तंबाखूमुक्त करूया

निकष क्र.१ 

अ) शैक्षणिक संस्थेच्या आवारात दर्शनी भागात ‘तंबाखूमुक्त परिसर’ असा फलक  

      असावा.

ब) फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव / हुद्दा / संपर्क क्रमांकाचा उल्लेख (साइन  

      बोर्डवर) असावा. 

निकष क्र. २


अ) "तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था " प्रवेशद्वाराच्या सीमेवर/ शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीवर असा फलक लावलेला असावा. 

ब) या फलकावर अधिकृत व्यक्तीचे नाव / पदनाम / संपर्क क्रमांकाचा उल्लेख फलकावर (साइन बोर्डवर) असावा.

निकष क्र. ३


शैक्षणिक संस्थेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचा पुरावा असू नये. उदा. सिगारेट / बिडीचे थोटके किंवा गुटखा/तंबाखूचे पाउच, भिंतीवर थुंकल्याचे डाग इत्यादी. 

निकष क्र. ४


तंबाखूच्या दुष्परिणामांवर आधारीत पोस्टर किंवा तंबाखूच्या दुष्परिणामांवर आधारीत साहित्य शाळेत प्रदर्शित केलेले असावे.

निकष क्र. ५


शैक्षणिक संस्थेत गेल्या सहा महिन्यांत किमान एक तंबाखू नियंत्रणावर आधारीत उपक्रम राबवणे.

निकष क्र. ६


शैक्षणिक संस्थेने अधिकृत व्यक्ती तंबाखूमुक्त शाळा मॉनिटर्स म्हणून (कर्मचार्‍यांमधून, अधिकारी किंवा शिक्षक किंवा विद्यार्थी प्रतिनिधी मधील नेमणुका) नेमले पाहिजेत. फलकावर तंबाखू मॉनिटर्सची नावे, पद/हुद्दा आणि संपर्क नंबर नमूद केले जावेत.

निकष क्र. ७

तंबाखूचा वापर शाळेच्या परिसरात केला जाणार नाही.’ हा नियम शैक्षणिक संस्थेच्या आचार संहितेमध्ये (Code of Conduct) समाविष्ट केला गेला पाहिजे.
निकष क्र. ८

शैक्षणिक संस्थेच्या बाह्य भिंतीपासून १०० यार्ड क्षेत्र रेखांकीत केले गेले पाहिजे.

निकष क्र. ९

तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे कोणतेही दुकान शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात नसावे.
TOBACCO FREE SCHOOL APP: 
तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष पूर्ण झाल्याचे पुरावे/फोटोज अपलोड करण्यासाठी
Tobacco Free School App डाउनलोड करा 

UDIES नंबर आणि "वेलकम1" या पासवर्ड चा वापर करून लॉगिन करा
सर्वेक्षण सुरु करा’ पर्यायाची निवड करा 
TFS 9 Criteria Survey घ्या आणि पूर्ण केलेल्या निकषांचे पुरावे अपलोड करा
सर्व निकषांची यशस्वी पूर्तता केल्यानंतर (बॅकएंड टीमद्वारे पोस्ट पडताळणी) म्हणजे 100 स्कोअर गाठल्यानंतर, प्रमाणपत्र डाउनलोड करा वर क्लिक करा.
तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र प्राप्त झाल्याच्या तारखेपासून २ वर्षे वैध मानले जाते, त्यानंतर वरील प्रक्रियेनुसार पुन्हा आवेदन करावे लागेल.
धन्यवाद....







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा