शनिवार, १४ फेब्रुवारी, २०२६

PM SHRI योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल अधिकारी ( CNO )यांची पीएमश्री शाळांना क्षेत्रीय तपासणी भेट अंतर्गत वर्ग स्तरीय तयारी.

                                                                           
PM SHRI योजनेअंतर्गत केंद्रीय नोडल अधिकारी ( CNO )यांची पीएमश्री शाळांना क्षेत्रीय तपासणी भेट अंतर्गत वर्ग स्तरीय तयारी.



वर्ग सातवा अ 
एकूण विध्यार्थी संख्या 51  ( मुले 27 +मुली 24 ) 
वर्ग शिक्षक सरोदे जलबा उमाजी ( MA BED)  विषय शिक्षक भाषा .
वर्ग स्तरावर घेतली जाणारे विविध उपक्रम आणि कृती:
1.Viksit Bharat Buildathon 2025 स्पर्धा 
     हा भारतातील सर्वात मोठा शालेय innovation challenge (हॅकथॉन) आहे, ज्याचे आयोजन Ministry of Education च्या Department of School Education and Literacy आणि Atal Innovation Mission, NITI Aayog व All India Council for Technical Education यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. त्यामध्ये सातवी अ च्या विध्यर्थ्यानी सहभाग घेऊन आपले प्रोजेक्ट सदर केले व प्रमाणपत्र मिळवले .त्यासाठी वर्गशिक्षक यांनी सहकार्य केले .


2. संविधान दिन निम्मित चित्रकला व निबंध स्पर्धा 
संविधान दिन भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो.
या दिवशी Constituent Assembly of India ने Constitution of India स्वीकारले.त्यानिमित्त इयत्ता सातवी मध्ये निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. व यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले





3. 26 डिसेंबर  वीर बाल दिवस  निम्मित निबंध व चित्रकला स्पर्धा 
    वीर बाल दिवस दरवर्षी 26 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
हा दिवस Sahibzada Zorawar Singh आणि Sahibzada Fateh Singh यांच्या शौर्य व बलिदानाच्या स्मरणार्थ पाळला जातो.
हे दोन्ही लहान साहिबजादे हे Guru Gobind Singh यांचे सुपुत्र होते. त्यानिम्मित निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली 
  ४.बालविवाह मुक्त भारत प्रतिज्ञा 
      विकसित भारत यामधील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारतातील स्त्रियांची उन्नती करणे फार महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये बालविवाह ही एक मोठी अडचण आहे त्यासाठी समाजातील सर्व थरात बालविवाहाच्या विरोधात मत तयार करून बाल विवाह रोकणे गरजेचे आहे.म्हणून भारत सरकार च्या निर्देशाने  शाळेतील विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधात शपथ घेतली आणि प्रमाणपत्र मिळवले



४ . 24 नोवेंबर २०२५ रोजी हिंद डी चादर हा कार्यक्रम घेण्यात आला 
“हिंद दी चादर” म्हणून ओळखले जाणारे Guru Tegh Bahadur यांचा शहीदी दिवस दरवर्षी मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. 2025 मध्येही शाळेत  खालीलप्रमाणे कार्यक्रम झाले:
गुरूंच्या जीवनावर श्री कदम सर यांनी माहिती दिली ,प्रभात फेरी काढण्यात आली .सातवी वर्गात चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली .इयत्ता सातवी अ तील विध्यार्थिनी तालुक्यातून प्रथम आली. 





5 खान अकॅडेमी पोर्टल वर सर्व 51 विध्यर्थ्यांचे नाव नोंदणी पूर्ण 
  Khan Academy ही एक मोफत ऑनलाइन शिक्षण देणारी संस्था आहे. येथे गणित (Math) आणि विज्ञान (Science) विषयांचे व्हिडिओ, सराव प्रश्न आणि चाचण्या उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे लॉगिन आयडी व पासवर्ड देण्यात आले आहे. पाठवण्यात आली आहे.
मी ज्ञानी होणार
  मी ज्ञानी होणार या सदराखाली दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्यांना पाठवण्यात येतात.त्यावर एक सामान्य ज्ञानाची परीक्षा घेऊन बक्षीस वाटप करण्यात येणार आहे.



७.उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी 
    उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी साठी सातवी अ वर्गातील 29 विध्यर्थ्यांची नोंदणी केली आहे.प्रोजेक्टरचा वापर करून परीक्षेची तयारी करून घेतली जात आहे .

https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:a102cd1b-f4b7-4c5c-9481-cabca66b7d91

विद्यार्थ्याचे सातत्य व सर्वंकष मूल्यमापन करण्यात येते त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रकल्प देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. खूप छान प्रदर्शन केले आहे.
अशाप्रकारे इयत्ता सातवी अ च्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व शालेय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येते.मार्गदर्शन केले जाते.
धन्यवाद ...